मराठी शायरी
मराठीशायर.कॉम या काव्य संग्रहाचा वेब साईट वर आपलं स्वागत आहे.
Subscribe to RSS feed
Subscribe by Email
Get Updates on Twitter
इतर साईटस
अपेक्षा
Fri, 21 Sep 2012
अपेक्षा अपेक्षा अपेक्षा
काही मोठं नाही ह्या पेक्षा
मैत्री कडून...प्रेमा कडून
सगळीच नाती गेली अपेक्षांनी जडून
नात्याचा महत्व वाटे जास्ती जितकं
अपेक्षेचं वजन त्यावर जास्ती तितकं
मग सहजच होतात अपेक्षा भंग
नात्यातल्या सगळ्या रंगाचा विरंग
अपेक्षा अपेक्षा अपेक्षा
काही मोठं नाही ह्या पेक्षा
काही अपेक्षा करतात खिसा तंग
तर काही बदलू पाहतात जगण्याचाच ढंग
अनेक असतात पण वीणा कारण
मोडता मात्र त्या तुमचा जीव तारण
आनंदावर अपेक्षांचे पडू नये विरजण
नाहीतर होते आयुशाचे रान नीरजन
अपेक्षा अपेक्षा अपेक्षा
काही मोठं नाही ह्या पेक्षा
अपेक्षांना सोडून जगू शकेल जो
सर्व सुखी जगात बनू शकेल तो
अपक्षा न बाळगता जे नाते निभवती
सुखद आनंदी धक्के तयाना लाभती
अपेक्षा न वाढवण्याचा प्रयत्न आपण हि करावा
नितळ प्रेमानी आपला घडा भरावा
वाचकांना टीप: बरेच दिवस नवीन कविता लिह्नी झाले नाही. त्या मुळे
तब्बल एक वर्षाने ह्या नवीन कवितेची संघ्रहात वाढ करीत आहे. ह्या पुढे नवीन
कविता लवकर लिहून पुन्हा इतक्या काळाचा अंतर होऊ नये हा प्रय्ताना मी करणार आहे.
आपल्या प्रोत्साहनासाठी आभारी आहे.
-सचिन

आमचं "तसं काही नाही"
Mon, 25 Jul 2011
मित्रा म्हणालास कित्ती कित्ती आवर्जुनही
"आमचं तसं काही नाही
फक्त मैत्री, नाही आणखी काही
तुझं उगाच चालतं बघ डोकं काहीबाही "
पण सकाळ संध्याकाळ तुमची सोबत जाई
फोनवर ना बोलता हि रहावत नाही
दुसरीकडे बघितलस तुही
कि होते तिची लाही लाही
तरी म्हणतोस मित्रा "तसं काही नाही"
मान्य आहे आम्हा हा नवीन जमाना
आम्हीही त्यातलेच काय सांगू बहाणा
मजा वाटते म्हणून पाहून तुम्हा दोघांना
पण ओळखून असतात चोरच दुसर्या चोरांना
आहे आयुष्य एकाच, त्यात मज्जा करना
लपवायचं कशाला उगीच गरज नसताना
नाही म्हणणार आम्ही तुम्हा "अरे लग्न करना"
विषय हि काढणार नाही कधी गप्पा मारताना
- सचिन

मित्र म्हणाला बाबा झालो...
Mon, 31 Jan 2011
मित्र म्हणाला बाबा झालो... तू कधी होणार सांग?
बाबा होउन सांग मित्रा फिटेल का आयुष्याचा पांग?
जन्मा आणून त्या जीवाला नेऊन पाळणाघरात टांग
शीक्षा भोगण्या अशी तयानी काय केला अपराध सांग
जाई जिथे तो या जगात लावावी लागेल सतत रांग
बाबा व्हायची झाली तयारी तुझी तरी कशी सांग
मित्र म्हणाला बाबा झालो... तू कधी होणार सांग?
बाबा होउन सांग मित्रा फिटेल का आयुष्याचा पांग?
माहितीये मला होणं बाबा काम नाही सोपं
कुंडीत लावली सहज तरी जोपासावी लागतात रोपं
झाडांना तरी होत नाही कधी सर्दी किवां ताप
चिमुकल्या जीवाला त्या घरी सोडता होईल स्वतःवर संताप
मित्र म्हणाला बाबा झालो... तू कधी होणार सांग?
बाबा होउन सांग मित्रा फिटेल का आयुष्याचा पांग?
सकाळी लवकर जाऊन येतो उशिरा असं माझं काम
बायकोचं हि तसच आहे नाही पळभर आराम
बाळ सांभाळायला मग ठेवावी लागतील मोलाने लोकं
नुसता विचार केला तरी गरगरतं हे डोकं
मित्र म्हणाला बाबा झालो... तू कधी होणार सांग?
बाबा होउन सांग मित्रा फिटेल का आयुष्याचा पांग?
प्रपंचाचा वाढवा करून होईल जीवाची लाही
मान्य मला आहे स्वार्थ ह्यात मोठा माझाही
बाबा व्हायची अजून तरी माझी तयारी नाही
म्हणून सांगतो मित्रा घाई नको काही... घाई नको काही.

काळा बोका
Tue, 29 Jun 2010
एक एक दिवसच त्रासदायक असतो
त्याच दिवशी नेमका कसा काळा बोका दिसतो
मग सगळे अपयश त्या बोक्याचा माथी
रस्ता ओलांडायची ह्याला भलतीच सुचली तिथी
पूर्वजांना आपल्या कशे हे विचित्र सुचले उपाय
मना मिळे सांथवन मग उलटे टाकून पाय
बोक्याला बिचार्या फक्त असते हवी दुधाची साय
जरा केलं शुक-शुक तर पाळतो धूम ठोकून पाय
तसा तो बोका असतो ओलांडत रस्ता रोजच
आपलं मात्र जातं लक्ष नेमके आजच
फोडावस वाटते मग त्याचा छोट्याशा डोक्यावर
आपल्या वाटी आलेल्या अपयशाचं खापर

अनकाळीचा पाऊस
Sat, 20 Feb 2010
आज अचानक अनकाळी हा पाऊस कशाने आला
वसंतात भिजलेल्या तिचिया केसांचा गंध आठवूनी गेला
गर्द मेघ हे असमंतातुनी गडाडूनी बरसुनी जाती
पेटवती मग अंतरी तिचा आठवणींचा वाती
अनकाळीचा पावसात ह्या भिजणे योग्य नाही
जवळी असता ती तिचिया आठवणीत रुजणे योग्य नाही
मन वेडे हा पाऊस कसाही गोड ह्याला वाटे
आठवण हि तशी हताळे सांजा अन पहाटे
अनकाळीचा पाऊस हा टिकला नाही काही
आठवणीचा दीप मात्र हा नितांत तेवता राही
सांगा दोस्तहो पावसात हे मन का वेडे रुजते
पावसाचा नवा खाली हे आठवणीत का हो भिजते

वेडी कविता
Wed, 06 Jan 2010
दिवस उन्हाळ्याचा आहे तापलेला
पण जीवाची घालमेल उन्हामुळे नाही
आयुष्याचा वाटेवर जे वळण मी घेतलेलं
आपल्या सुखाचा गावी आपल्याला पोचवेल कि नाही
जुळलेली मनं कधी वेगळी होऊन धड-धडताना
कधी एकमेकां पासून लपवून ठोके चुकवताना
डोळ्यात नसलेलं हसू ओठांवर उमटताना
वाया जातंय जीवन विरहात जगताना
तुझा वाटेला डोळे लाऊन बसताना
प्रत्येक क्षणात विचारांच्या वादळाचा पाऊस
डोकं म्हणतं नको वेडा होऊस
पण मनातनं हाक येते... नको ना जाऊस
वादळापासून लपायला तुझा कुशीत आलो तर
तिथे पण केलंय एका वादळाने घर
हि वादळे शांत होणार कधी
वाहणार कधी शांतपणे निथळ प्रेमाची नदी
आज माझे शब्दही वाऱ्यावर भिरभिरतायत
वावटळीचा आवेगात आपला अर्थ हरवतायत
अर्थ पूर्ण हरवायचा आत वावटळ सरूदे
शब्दांचा ह्या माझ्या अर्थ तुला कळूदे… अर्थ तुला कळूदे…

श्वास
Wed, 16 Dec 2009
फोनवर बोलता बोलता तू निजून स्वप्नांचा गावा गेलीस
पण तुझा श्वासांचा मंद स्वर मला ऎकू येत होता
हळूच हात धरून जसा मला तुझा कुशीत नेत होता
नुसता तुझा श्वास ऎकून मन शांत होतं
तू झोपी गेलीस तरी मला माझं मन बोलत होतं
श्वासातन तुझा ऎकायला मला त्याची धड धड येते
तुझा छातीत राहतंय ना ते त्याला माझी आठवण येते
माझाकडचा तुझा मनाला भेटीची ओढ लागते
काय सांगू प्रिये तुला तुझा शिवाय कसा जगतो मी
जगतो काय कसा बसा दिवस काढतो मी
कधी तो दिवस येईल ह्याचीच वाट आहे
आशा तेवढीच बुडनार्यासाठी गवताचं ताट आहे

मी आणि तू
Mon, 30 Nov 2009
तुझी मी
माझा तू,
आपण एकमेकांचे.....
माझे डोळे
तुझीच छटा,
स्वप्न चांदण्यांचे...
तुझे ओठ
माझी गोडी,
गुपित भारावल्या क्षणांचे....
माझे श्वास
तुझी धडधड,
संकेत मीलनाचे.....
तुझी मी
माझा तू
सत्य जीवनाचे.....
- प्रीती
माझा तू,
आपण एकमेकांचे.....
माझे डोळे
तुझीच छटा,
स्वप्न चांदण्यांचे...
तुझे ओठ
माझी गोडी,
गुपित भारावल्या क्षणांचे....
माझे श्वास
तुझी धडधड,
संकेत मीलनाचे.....
तुझी मी
माझा तू
सत्य जीवनाचे.....
- प्रीती
अंतर
Fri, 20 Nov 2009
तुझ्या-माझ्या मधे हे किती योजने अंतर..
तू मला अन मी तुला असे समांतर !
जन्मांतरीची साथ ही आपुली…
तरी नाते अधीर - अधांतर !
दाटलेले शब्द ओठी, पोचवू कसे तुला?
आसुसली माझी मिठी, पाठवू कशी तुला?
हुंकार तुझे ऐकुनी होतसे जिवाची लाही....
लाचार मी असा, बस इथून तुजला पाही !
ऋतू आला, गेला ऋतू... आतूर तू
क्षितिजा पार मीलन हे जाण तू
सखे-लाडके जरा प्रतिक्षा, धीर जरा...
मेघदूता सवे ओली माया भिजवेल धरा !
- प्रीती
तू मला अन मी तुला असे समांतर !
जन्मांतरीची साथ ही आपुली…
तरी नाते अधीर - अधांतर !
दाटलेले शब्द ओठी, पोचवू कसे तुला?
आसुसली माझी मिठी, पाठवू कशी तुला?
हुंकार तुझे ऐकुनी होतसे जिवाची लाही....
लाचार मी असा, बस इथून तुजला पाही !
ऋतू आला, गेला ऋतू... आतूर तू
क्षितिजा पार मीलन हे जाण तू
सखे-लाडके जरा प्रतिक्षा, धीर जरा...
मेघदूता सवे ओली माया भिजवेल धरा !
- प्रीती
दिवस
Fri, 13 Nov 2009
आला दिवस गेला आणिक
झाला पुन्हा जुना,
'उद्या' उजाडे अन् दाराशी
जणु नवा पाहुणा !
नवे स्वप्न, नव्या आशा
मनी उमले पुन्हा,
मधेच अलगद आणि अचानक
दार वाजवी, स्मृती-खुणा !
हरएक दिसाची आपुली ओळख
ज्याच्या-त्याचा मना,
अनुभव म्हणती कोणी आणिक्
'आयुष्य' कोणी म्हणा !!
- प्रीती
झाला पुन्हा जुना,
'उद्या' उजाडे अन् दाराशी
जणु नवा पाहुणा !
नवे स्वप्न, नव्या आशा
मनी उमले पुन्हा,
मधेच अलगद आणि अचानक
दार वाजवी, स्मृती-खुणा !
हरएक दिसाची आपुली ओळख
ज्याच्या-त्याचा मना,
अनुभव म्हणती कोणी आणिक्
'आयुष्य' कोणी म्हणा !!
- प्रीती
कथा आणि व्यथा
Sun, 08 Nov 2009
किती कथा, किती व्यथा.....
इथून-तिथून, अशा तशा
ह्याच्या-त्याच्या, माझ्या-तुझ्या
चार भिंती, चार फरशा !
आत-आत खोल-खोल
भिरभिर फिरता एक भोवरा...
सांग ना आता कुठे-कसा
शोधून सापडेल खरा चेहरा ? ?
पापणीवर येवून थांबलेला थेंब
ओठावर येवून लांबलेला शब्द...
मन पछाडलेला एक प्रश्न,
ही नियती, की प्रारब्ध ? ? ?
- प्रीती
इथून-तिथून, अशा तशा
ह्याच्या-त्याच्या, माझ्या-तुझ्या
चार भिंती, चार फरशा !
आत-आत खोल-खोल
भिरभिर फिरता एक भोवरा...
सांग ना आता कुठे-कसा
शोधून सापडेल खरा चेहरा ? ?
पापणीवर येवून थांबलेला थेंब
ओठावर येवून लांबलेला शब्द...
मन पछाडलेला एक प्रश्न,
ही नियती, की प्रारब्ध ? ? ?
- प्रीती
पाऊस
Tue, 20 Oct 2009
कार्यालयाचा बाहेर पडणाऱ्या पावसाचे थेंब एक डबकं साठवतंय
लहानपणी कुतुहलाने अशाच डबक्या कडे तासन् तास बघणं आठवतंय
आठवतीय त्याच डबक्यात सोडलेली ती कागदाची होडी
आठवतीय कुठूनशी मधेच उडी मारणारी बेडकी देखील थोडी
पाऊस सरल्यावर ती बेडकी पाण्यामागे निघून जाते जशी
आपली वाटचाल त्या डबक्या पासून ह्या डबक्या पर्यंत तशी
आयुष्याचा ओलावा टिकवून ठेवण्याच्या धडपडीत
कधी मायेचा विमानात तर कधी प्रेमाचा होडीत
चार दोन दिवसात हेहि डबके नाहीशे होईल
मनात फक्त ते लहानपणचे डबके तसेच राहील
दर पावसाळ्यात व्हावे एकदा तरी आठवणींचे डबके तुडूंब भरायला
माणूस आहोत आपण ह्याची जणू आठवण करायला